team jeevandeep 08/02/2025 adhyatma Share
हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारी लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करतो, त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मी नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. तिच्या कृपेनं माणसाच्या जीवनात ऐश्वर्य, वैभव आणि यश प्राप्त होते. शुक्रवारी विधीनुसार लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शुक्रवारी करण्याच्या लक्ष्मी पूजनाच्या पद्धती जाणून घेऊ.
1. लक्ष्मीचे व्रत ठेवा:
ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी सांगितले की, पौराणिक मान्यतेनुसार, शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत केल्यानं भक्तांना तिचा आशीर्वाद मिळतो. तिची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करावी.