Visitors: 226962
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

सिंदुरचे धार्मिक महत्व

  team jeevandeep      08/05/2025      adhyatma    Share


हिंदू धर्मात सिंदूरला अत्यंत महत्व आहे. सिंदूरशिवाय साताजन्माचे नाते देखील अधुरे आहे. लग्नात पतीने पत्नीच्या भांगेत सिंदूर भरल्यानांतर ते लग्न पूर्ण झाल्याचे मानले जाते. त्यामुळे सिंदूरला सौभाग्याचे प्रतीक देखील मानतात. या सिंदुरचे जसे धार्मिक महत्व आहे तसेच त्याच्या काही उपायांमुळे जीवनातील अडीअडचणी देखील दूर होतात. नात्यात प्रॉब्लेम असेल तर तो देखील नाहीसा होतो. चला तर मग पाहुयात सिंदुरचे चमत्कारिक उपाय काय आहेत.

कुंकवाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य अपूर्ण असते. आपल्या प्रत्येक देवपूजेत कुंकू वापरले जाते. कुंकू देवांना जसे प्रिय आहे तसेच ते सौभाग्याचे प्रतीक म्हणून सुवासिनींना देखील प्रिय आहे. सौभाग्यवती महिलांचा शृंगार कुंकवाशिवाय अधुरा आहे असे बोलले जाते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला भांगेत सिंदूर भारतात. मात्र हाच सिंदूर तुमच्या सौभाग्याचे रक्षण तर करतोच शिवाय तुमच्या नात्यात समस्या आल्या तर त्या देखील दूर करतो. होय सुंदरचे अनेक चमत्कारिक उपाय आहेत ज्यामुळे दुःख, पीडा, कष्ट निवारल्या जातात. पाहुयात कुंकवाच्या कोणत्या उपायांनी आपण आपल्या समस्या दूर करू शकतो.

सिंदुरचे उपाय

सिंदूर म्हंटले की डोळ्यासमोर हनिमंजी येतात. मारुतीला सिंदूर किती प्रिय आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे अनेकजण मारुतीला शनिवार आणि मंगळवारी सिंदूर चढवतात. त्याला चोला चढवणे देखील म्हणतात. हा सिंदूर आपल्या समस्या दूर करण्यासाठी हनुमानजींना कसा चढवायचा पाहू. मारुतीला चमेलीचे तेल प्रिय आहे त्यामुळे चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून तो सिंदूर हनुमानजींना लावल्याने ते प्रसन्न होता आणि कृपा करून तुमच्या समस्यांचे निवारण करतात असे बोलले जाते.

आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सतत आजारी पडत असेल अथवा आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा कुंकू उतरवून ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करून यावे. यामुळे नकारात्मकता निघून जाते आणि चांगले आरोग्य लाभते असे म्हणतात.

घरात सुख समृद्धी शांती हवी असेल तर दररोज पूजा करण्याआधी आपल्या दरातील उंबऱ्याचे पूजन करण्याची पद्धत आहे. पूजन करताना उंबरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा मग त्याला हळद कुंकू लावून पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात वास करते यामुळे धनसंपत्ती सानी सुख येते.

अनेकजणांच्या बाबतीत असे होते की कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. प्रत्येक कामात अडचणी येतात. कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळत नाही. छोटी गोष्ट मिळवायला देखील संघर्ष करावा लागतो तर यासाठी तुम्ही कुंकवाचा उपाय करू शकता. कुंकू स्वतःवरून उतरवून पाण्यात सोडावे यामुळे ग्रहांचा दुष्परिणाम नाहीसा होतो.

पती पत्नीच्या नात्यात सिंदुरचे महत्व तर अनन्य साधारण आहे. जसे सिंदूर पत्नीचे सौभाग्य वाढवते. तसेच कुंकवाच्या उपायाने पती पत्नीमधील प्रेम आणि नाते घट्ट होते. जर नवरा बायकोमध्ये वाद होत असतील. टोकाची भांडणे झाली, एकमेकांशी पटत नसेल तर झोपताना नवऱ्याच्या उशीखाली कुंकवाची पुडी ठेवावी असे सलग सात दिवस करावे यामुळे नात्यातील कटुता नाहीशी होते आणि प्रेम वाढते असे बोलतात.

+