Team jeevandeep 22/08/2024 स्थानिक बातम्या
मुरबाड : ठाणे जिल्हा क्षयरोग कमिटी तर्फे ग्रामपंचायत क्षयरोग सर्वेक्षण २०२३-२४ अंतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून आज ग्राम पंचायत आंबेटेंभे सरपंच प्रियांका चौधरी, उपसरपंच महेश कंटे, ग्रामसेवक संतोष उबाळे तसेच सदस्य यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्षयरोग(टिबी) मुक्त गाव म्हणून प्रशस्तीपत्रक, महात्मा गांधिजींची मूर्ती देऊन गौरविण्यात आले.क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत झाल्याने तालुक्यात आंबे टेंबे ग्रामपंचायतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमाला उपस्थित ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग काळे , ग्रामपंचायत , जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा आरोग्य क्षयरोग अधिकारी मॅडम, मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे उपस्थित होते.