00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Thane jeevandeep       07/09/2024      स्थानिक बातम्या


sarvapalli 

कल्याण : “डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व ज्यांनी शिक्षकी पेशापासून सुरुवात करून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतली. अत्यंत तल्लख बुद्धेचे, तत्त्वज्ञ, विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. या जन्मदिनाच्या निमित्ताने ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र मोठया उत्साहाने साजरा केला जातो. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मोठा उत्साहाने साजरा केला जात आहे याचा मला निश्चितच अभिमान वाटतो.” असे उद्गार भिवंडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  संजय अस्वले यांनी काढले.

५ सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांचा सन्मान होतो. त्याचबरोबर शाळेतले विद्यार्थी या दिवशी शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन शाळा सांभाळण्याचं कसब पार पाडत असतात. राहनाळ शाळेत या उपक्रमाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आखणी केल्याचं दिसून येत आहे. असे अस्वले म्हणाले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला भिवंडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले, पालक रजनी नाईक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा” या गीताचे सामूहिक गायन केले. आपल्या शिक्षकांबद्दल आदरभावना व्यक्त केली. भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत केंद्रस्तरावर ते मेरिट रॅकमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन संजय अस्वले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकुश ठाकरे यांनी केले.

+