00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  टीम, जीवनदीप वार्ता       01/08/2024      पाककृती


पावसाळ्यात काही तरी बाहेरून आणावं आणि डब्यात घालून घेऊन जावं म्हंटल की, आरोग्य समस्यांना आमंत्रण द्यायचं तेही नकोस वाटतं. मग यातून मार्ग काय काढायचा असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो. पण, अशा वेळी घरच्याघरी कमी वेळात काहीतरी कुरकुरीत बनवायचं असेल तर तुम्ही एक आगळावेगळा चिवडा बनवू शकता. तर आज आपण ‘कच्चा केळींचा चिवडा’ कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

साहित्य :

  1. कच्ची केळी – पाच ते सहा
  2. शेंगदाणे – एक चमचा
  3. काजूचे तुकडे – एक चमचा
  4. खोबऱ्याचा किस किंवा कातळी – अर्धी वाटी
  5. बेदाणे – एक चमचा
  6. तीळ – एक चमचा
  7. मीठ
  8. हळद
  9. तिखट
  10. साखर
  11. तेल
  12. हिंग
  13. मोहरी
  14. धने-जिरेपूड

कृती :

  1. केळ्यांची साले काढून किसून घ्या.
  2. किस पाण्यात घाला.
  3. त्यानंतर हा किस एका कापडावर पसरवून घ्या.
  4. कढईत तेल घ्या आणि हा किस कुरकुरीत तळून घ्या.
  5. तेल तापवून हिंग, मोहरीची फोडणी करून त्यावर शेंगदाणे, काजू तुकडे, खोबऱ्याच्या कातळ्या किंवा किस, बेदाणे, तीळ, एकामागून एक तळून घ्यावे.
  6. त्यावर तळलेला केळ्याचा किस घालून वर मीठ, साखर(पिठी), हळद, तिखट, धने-जिरे पूड घालून गॅस बंद करावा.
  7. अशाप्रकारे तुमचा ‘कच्चा केळींचा चिवडा’ तयार.

महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक म्हणजे ‘केळी’. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी बाराही महिने उपलब्ध असतात. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. कच्च्या केळीचे अनेक पदार्थ बनवले जातात. तुम्ही आतापर्यंत कच्च्या केळीचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. वेफर्स, भजी, भाजी आदी. तर आज आपण कच्च्या केळाचा चिवडा कसा बनवायचा हे पहिला ; जो तुम्ही ऑफिसलाही घेऊन जाऊ शकता, मुलांना खाऊच्या डब्यातही देऊ शकता.

+