00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Team Jeevandeep      19/08/2024      क्रीडा


बांगलादेशमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर बांगलादेशमधील भयानक फोटो समोर येत आहेत. हिंसक जमावाकडून मानवाधिकार कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. देशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची हत्या केली जात आहे. मंदिरे तोडली जात आहेत. महिलांवर अत्याचार केले जात आहेत. मॉब लिंचिगचे वृत्त देखील येत आहे. अत्याचाराचे आणि हल्ल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर येत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याशी फोनवर बोलून हिंदूंसह सर्व अल्पसंख्यांकांच्या सुरक्षा आणि संरक्षण देण्यास सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

या दरम्यान बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध भारताच्या २ कसोटी आणि ३ टी-२० लढती होणार आहेत. बीसीसीआयने भारताच्या या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता जेव्हा बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येईल तेव्हा त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. पण बांगलादेशात होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनावर भारतने ऑस्ट्रेलिया सारखा निर्णय घ्यावा का? क्रिकेट खेळण्याची ही योग्य वेळ आहे का? बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर अशा पद्धतीची शांतता का?

+